मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय; केवळ शाळा सोडली म्हणून दुरुस्ती नाकारता येणार नाही.
मुंबई : शाळा सोडल्यानंतर शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात झालेली नजरचुकीची अथवा अनवधानाने झालेली चूक दुरुस्त करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
नाव, जन्मतारीख किंवा अन्य शैक्षणिक नोंदींमध्ये चूक झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे केवळ या कारणावरून दुरुस्ती नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नेमका निर्णय काय?
शालेय रेकॉर्डमध्ये जाणीवपूर्वक नव्हे, तर नजरचुकीने किंवा अनवधानाने चूक झाली असेल, तर विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही नियमानुसार ती दुरुस्त करता येऊ शकते. यासाठी संबंधित विद्यार्थ्याला योग्य पुरावे सादर करून दुरुस्ती करून घेण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे पूर्णपीठाने स्पष्ट केले.
प्रकरण काय होते?
जालना जिल्ह्यातील जनाबाई हिमतराव ठाकूर यांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येत नाही, असे सांगून त्यांचा अर्ज नाकारण्यात आला.
यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात शासनाने माध्यमिक शाळा संहितेतील नियम २६.३ आणि २६.४ चा आधार घेतला होता. विद्यार्थ्याने शाळेत शिक्षण घेत असतानाच रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येते, अशी शासनाची भूमिका होती.
पूर्णपीठाकडे प्रकरण का गेले?
या मुद्द्यावर औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाच्या यापूर्वीच्या निर्णयांमध्ये वेगवेगळी मते समोर आली होती. त्यामुळे कायदेशीर स्थिती स्पष्ट करण्यासाठी हे प्रकरण पूर्णपीठाकडे सोपवण्यात आले.
पूर्णपीठाने स्पष्ट केले की, शालेय नोंदीतील चूक जाणीवपूर्वक केलेली नसून नजरचुकीने किंवा अनवधानाने झाली असल्यास, विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे या एकमेव कारणावरून दुरुस्ती नाकारता येणार नाही.
विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
या निर्णयामुळे शाळा सोडल्यानंतर आपल्या प्रमाणपत्रात किंवा शालेय रेकॉर्डमध्ये नाव, जन्मतारीख अथवा अन्य नोंदींमध्ये चूक आढळलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चुकीच्या शैक्षणिक नोंदींमुळे पुढील शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता योग्य पुरावे आणि नियमानुसार नोंद दुरुस्ती करून घेण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
महत्त्वाचे : दुरुस्ती आपोआप होणार नाही; संबंधित नियम आणि आवश्यक पुराव्यांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.