UBN न्यूज नेटवर्क.
उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचे मुंबईत शक्तीप्रदर्शन मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या भव्य महामोर्चात लाखोंची संख्येने मातंग समाज मुंबईला हक्कासाठी पोहचला. अनुसूचित जाती (SC) आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण (अ-ब-क-ड वर्गीकरण) तातडीने लागू करावे, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आणि मागण्या:
• आरक्षणाचे उपवर्गीकरण: अनुसूचित जाती जमातींमधील आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत, विशेषतः वंचित राहिलेल्या मातंग समाजापर्यंत समान पद्धतीने पोहोचावा यासाठी कायदेशीर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
• सर्वोच्च न्यायालयाचा निकाल: सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानंतर महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
• नेतृत्व आणि सहभाग: या आंदोलनात राज्यातील विविध भागांतून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार अमित गोरखे, माजी मंत्री रमेश बागवे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर अजिंक्य चांदणे, विष्णुभाऊ कसबे, सचिन साठे, अनिल हातागळे गणपत भिसे यांसह अनेक प्रमुख नेते आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यात उपस्थित होते.
सरकारची भूमिका (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस):
• उपवर्गीकरणाबाबत सर्वसहमती तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
• सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उपवर्गीकरण करताना कोणत्याही जाती-जातीत तेढ निर्माण होऊ नये आणि कोणावरही अन्याय होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे.
• या अर्जांवर विचार करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा