शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन...
प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
राजुरा, ता. मालेगाव, जि. वाशिम यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजुरा येथे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत अनोखे आंदोलन केले.
कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, तसेच शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दामू अण्णा इंगोले यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, मोठ्या मेहनतीने उभे केलेले सोयाबीन पीक प्रतिकूल हवामानामुळे हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सोयाबीन पिकाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारामुळे राजुरा परिसरातील शेतकऱ्यांची नाराजी आणि पीक नुकसानीची तीव्रता अधोरेखित झाली.

टिप्पणी पोस्ट करा