Top News

गणेशोत्सवातील पोस्टर सादरीकरण स्पर्धेत मंगेश केशव कांबळे प्रथम

प्रतिनिधी स्वाती गायकवाड 
केनवड : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या लेट रामरावजी झनक कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, केनवड येथे गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर सादरीकरण स्पर्धेत मंगेश केशव कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत मंगेश कांबळे यांनी प्रभावी व उत्कृष्ट पोस्टर सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाविद्यालयाच्या वतीने १९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘Certificate of Participation’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण जुंघरे सर यांच्या हस्ते मंगेश केशव कांबळे यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
मंगेश कांबळे यांच्या या यशाबद्दल प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने