Top News

वाशिमच्या श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील डॉ. रविंद्र एस. मडावी यांना ‘उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी’ पुरस्कार जाहीर.

वाशिम प्रतिनिधी - महादेव आवारे : दि.२६ सप्टेंबर २०१६, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने सत्र २०२५-२०२६ साठी देण्यात येणारा ‘उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी (Best Student Development Officer)’ पुरस्कार वाशिम येथील श्री. सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील डॉ. रविंद्र एस. मडावी यांना जाहीर करण्यात आला आहे.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विनियम क्र. ०६/२०२६ मधील तरतुदीनुसार सत्र २०२५-२०२६ मध्ये विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. रविंद्र एस. मडावी यांची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुरस्कार वितरण समारंभ आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथे होणार आहे. यावेळी डॉ. रविंद्र एस. मडावी यांना ‘उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी याबाबत महाविद्यालयाला अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली असून, पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. मडावी यांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
अध्यक्ष मनोज कोठारी एडवोकेट राहुल कोठारी ,प्राचार्य डॉक्टर अतुल राऊत डॉक्टर उद्धव जमदाडे डॉक्टर देवानंद अंभोरे लेखापाल भास्कर पट्टेबहादुर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वतीने परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे सदर पुरस्कार हा बुलढाणा येथे देण्यात येणार आहे
या निमित्ताने डॉक्टर उद्धव जमदाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अतुल राऊत अध्यायाचे अध्यक्ष मनोज भाऊ कोठारी एडवोकेट राहुल भाऊ कोठारी डॉक्टर देवानंद अंभोरे लेखापाल भास्कर पट्टेबहादूर सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने