मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२६ : मातंग समाजाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजबांधव, कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदान येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
मागील दोन वर्षांपासून सरकारकडून आरक्षण उपवर्गीकरणाबाबत तारीख दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या कालावधीत मातंग समाजाने महाराष्ट्रभर शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने केली. मात्र, अद्याप आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात शासन निर्णय झालेला नसल्याने समाजामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
आरक्षणाचा लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच शिक्षण, रोजगार आणि प्रतिनिधित्वाच्या संधींमध्ये न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र असून आंदोलकांकडून “आरक्षण उपवर्गीकरण लागू करावे” अशी मागणी जोरदारपणे मांडली जात आहे.
“आरक्षण उपवर्गीकरणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत मुंबई सोडणार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
वृत्त : UBN लोकशाही टाइम्स.

टिप्पणी पोस्ट करा