विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर च्या माध्यमातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश.login.corp.google.com
प्रतिनिधी: स्वाती गायकवाड
श्री शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गोभणी येथे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बोडखे सर आणि पर्यवेक्षक श्री हाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तर विज्ञान शिक्षक श्री केनवडकर सर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. हाडे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कैलास हरकळ व डॉ. रोशन साबळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ख्यातनाम हृदय रोग तज्ञ डॉ. प्रशांत आटोळे साहेब व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे श्री. शिवाजीराव कव्हर सर उपस्थित होते. यावेळी श्री कव्हर यांनी व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार आई वडिलांच्या कष्टाची जाणीव अशा अत्यन्त महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्यात.
तर डॉ प्रशांत आटोळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
व्यसनमुक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळेतील 63 विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती विषयावर पोस्टर तयार केले. या पोस्टरमधून व्यसनाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. उत्कृष्ट पोस्टर्समधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येणार आहेत.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच भारतवर्षाची अस्मिता असलेल्या भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर पोहोचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे श्री. लेमाडे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन बोडखे सर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. घायाळ सर, श्री. घोटे सर, श्री. लेमाडे सर, श्री. पोघे सर, अंभोरे मॅडम आणि शाळेचे ग्रंथपाल श्री. खराटे सर, कुंडलिकराव झनक आणि गणेश चव्हाण उपस्थित होते.
“व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार” हा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. केनवडकर सर यांनी केले तर आभार श्री लेमाडे सर आणि माणले.

टिप्पणी पोस्ट करा