प्रा. डॉ. मोहन खडसे
मो.नं.९८२३२८१०२५
स्वतःसाठी तर कुणीही स्वप्न पाहतं. स्वप्न पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. स्वप्नं काय फक्त स्वतःसाठी असतात? नाही! ती देशासाठी, समाजासाठी, लोकांच्या भल्यासाठीसुद्धा असतात, हे खरं आहे. कितीतरी माणसं, कितीतरी संस्था ह्या लोकांसाठी लढत असतात; त्यांना बळ देणं हे लोकांचं कार्य आहे, यात शंकाच कुठे आहे?
स्वप्न सगळ्यांनाच असतात ती असलीच पाहिजेत, तरच माणूस कार्यरत राहतो, काम करतो. आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी माणूस काय करेल याचा नेम नाही. हे खरं असलं तरी नियतीच्या पुढे माणसाचे स्वप्नही थिटी पडण्याची शक्यता असते, मात्र जगात काही घटना अशा घडतात ज्या माणसाच्या इच्छा शक्तीसमोर नियतीला, निसर्गाला मागे टाकण्याची शक्यता असते.तांत्रिकदृष्ट्या मरण पावलेली माणसं ही पुन्हा जिवंत झाल्याच्या अनेक घटना वर्तमानपत्रातून येत असतात. खरं म्हणजे ती माणसं मरण पावलेली नसतात. त्याला काही कारणेही असतात. त्याच्या इच्छा आणि आकांक्षा या जन्म-मृत्यूच्या पलीकडे पोहोचलेल्या असतात. अशीच घटना घडली ती नॉर्वेच्या फुटबॉल मुख्य प्रशिक्षक स्टाले सोल्बाकेन यांचे संबंधी ! आपला संघ २००२ चा वर्ल्डकप खेळावा व आपणही त्या संघात असावे, असे त्याचे स्वप्न होते, मात्र नियतीला काही दुसरेच काही मंजूर होते. त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्याला आठवला...
प्रसिद्ध शायर हस्ती यांचा एक शेर-
"शगुन नही देखा करते
मौत, मुसीबत, जीत और मात"
डॉक्टरांनी त्याला क्लिनिकली मृत घोषित केले मात्र क्लबच्या डॉक्टरांनी काही प्रयत्न सोडले नाहीत अन् उपचार केले. सातत्याने केले.माणसाच्या सततच्या प्रयत्नाला म्हणा की वेळीच केलेल्या प्रयत्नाला म्हणा परमेश्वरसुद्धा यश देतो, असं म्हणतात आणि त्या मुख्य प्रशिक्षकाच्या हृदयात धडधड सुरू झाली आणि जिवंत झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तो खेळला. पुन्हा खेळला. संघासाठी खेळला म्हणजेच देशासाठी खेळला आणि विजय झाला. पात्रता फेरीमध्ये त्याच्या संघाने विजय मिळवला आणि त्याचे एक स्वप्न साकार झालं. आयुष्याकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहण्याची त्याची सवय अखेर कामास आली ती अशा पद्धतीने !माणसाच्या जगण्यामध्ये कितीही जीवघेणी निराशा आली, तरी त्यातून बाहेर येऊन सकारात्मकतेने प्रयत्नशील राहिल्यास यश निश्चित मिळते याचे स्टाले सोल्बाकेन हे एक उदाहरण आहे. देशाच्या विजयासाठी पुन्हा जिवंत होणाऱ्या प्रयत्नांना साथ देण्याचं ! सकारात्मकतेचं !! त्याने करून दाखवलं. त्याचेवेळी त्याच्या चाहत्यांना, प्रसिद्ध शायर हस्तीमल हस्ती यांचा एक शेर पुन्हा डोळ्यासमोर आला तो असा-
"जान अपनी दे कर भी
जिंदगी कमा लाया
पत्थरों की बारिश में
आईना बचा लाया"
स्वतःसाठी तर कोणीही स्वप्न पाहतं. स्वप्न पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. स्वप्न काय फक्त स्वतःसाठी असतात ? नाही ! ती देशासाठी, समाजासाठी, लोकांच्या भल्यासाठीसुद्धा असतात हे खरं आहे. कितीतरी माणसं, कितीतरी संस्था ह्या लोकांसाठी लढत असतात, त्यांना बळ देणं हे लोकांचे कार्य आहे, यात शंकाच कुठे आहे?लोकांच्या भल्यासाठीसुद्धा असतात हे खरं आहे. कितीतरी माणसं, कितीतरी संस्था ह्या लोकांसाठी लढत असतात, त्यांना बळ देणं हे लोकांचे कार्य आहे, यात शंकाच कुठे आहे ? ज्याला पत्थरों की बारिश असं म्हणतात, ती तर नेहमी सुरू असते हो, पण त्यातही अनेक माणसं देशासाठी, समाजासाठी शेतकऱ्यांसाठी, काहीतरी करत असतात, त्यांना लोकांचे बळ लाभले तरी किती चांगले होईल ! होतं बऱ्याचदा !! माणसाच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वार्थाची किनार नसली तर ती पूर्ण ती स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते, असं समजलं जातं, ते खरं करून दाखवण्याची क्षमता माणसात असते, त्याच्या धडपडीत असते, यात शंकाच नाही.


टिप्पणी पोस्ट करा