छायाचित्र : मान्यवरांचे स्वागत व सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष श्री उत्तमचंदजी बगडिया, सचिव श्री विठ्ठलजी वसु, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी.
प्रतिनिधी :स्वाती गायकवाड
शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी; प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
रिसोड, येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयास महाराष्ट्र राज्याचे मा. उच्च शिक्षण संचालक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे मा. कुलगुरू प्रो. डॉ. के. एम. कुलकर्णी तसेच प्राचार्या डॉ. मंगला कुलकर्णी यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली.
महाविद्यालयात आगमन झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उत्तमचंदजी बगडिया व सचिव माननीय श्री विठ्ठलजी वसु यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी तसेच प्राध्यापक वृंद व सर्व कर्मचारीवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदिच्छा भेटीदरम्यान प्रो. डॉ. के. एम. कुलकर्णी व डॉ. मंगला कुलकर्णी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम, अध्यापन प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या भौतिक व शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा तसेच विविध विभागांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला.
यानंतर उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने समस्त कर्मचारीवर्गाच्या वतीने प्रो. डॉ. के. एम. कुलकर्णी व प्राचार्या डॉ. मंगला कुलकर्णी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ,प्रा. टिकार, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. वानखेडे, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा.जुनघरे, प्रा. राऊत, प्रा. राम जुनघरे, प्रा. वाघ, प्रा. पाठक मॅडम, प्रा. बोंडे मॅडम, श्री ओंकार पुरी, डॉ. नरवाडे, डॉ. काळे मॅडम, डॉ. मनवर, प्रा. वानरे मॅडम, प्रा. जाधव ,प्रा. गाडेकर, प्रा. सोळंकी, प्रा. प्रजापती, श्रीमती नरवाडे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुमित लाव्हरे, तर आभार प्रदर्शन प्रा.अमर साबळे यांनी केले.
या भेटीमुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरणाला निश्चितच प्रोत्साहन मिळाले असून, मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयाच्या आगामी शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा व प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा