वाशिम : यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘चंद्रावरची शाळा’ ही अनोखी आणि भविष्यवेधी थीम साकारण्यात आली आहे. भारतीय बाल संशोधकांच्या नजरेतून भविष्यातील प्रगत शिक्षणव्यवस्थेची कल्पना या माध्यमातून मांडण्यात आली आहे. या संकल्पनेमागे वाशिम जिल्ह्यातील बालवैज्ञानिक विराज शिंदे याची प्रेरणा आहे.
विराज शिंदे हा वाशिम जिल्ह्यातील पहिला दिव्यांग विद्यार्थी असून, बालसंशोधक म्हणून त्याची ‘INSPIRE-MANAK National’ स्पर्धेसाठी थेट दिल्ली येथे निवड झाली आहे. विराजच्या या यशातून प्रेरणा घेऊन वाशिमच्या मातीतून आणखी अनेक बालसंशोधक घडावेत, हा या थीममागील मुख्य उद्देश आहे.
या अनोख्या ‘चंद्रावरच्या शाळे’च्या विश्वात गणपती बाप्पाची संकल्पनाही आगळीवेगळी मांडण्यात आली आहे. निराकार विश्व निर्माण करणारा गणपती बाप्पा ढगांवर विराजमान असून, विराजसह इतर बालवैज्ञानिकांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी तो अवतरल्याची संकल्पना साकारण्यात आली आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्यात्माची सांगड घालत विद्यार्थ्यांना Space Science, INSPIRE-MANAK प्रकल्प आणि संशोधनाची गोडी लागावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

‘चंद्रावरची शाळा’ ही पारंपरिक शाळांपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल, अशी कल्पना या थीममध्ये मांडण्यात आली आहे. येथे मारझोड किंवा घोकंपट्टीला स्थान नसेल. मुले डिजिटल माध्यमातून शिक्षण घेतील. स्पेस स्टेशन ही त्यांची मुख्य सायन्स लॅब असेल, तर पृथ्वीवरून रॉकेटद्वारे मुले शाळेत ये-जा करतील.

वर्गात Robo Teachers आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांवर केवळ ठराविक अभ्यासक्रम लादण्याऐवजी, ज्याला जे आवडते ते शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे अभ्यास रटाळ वाटणार नाही आणि कॉपी करण्याची गरजही भासणार नाही, अशी कल्पना या थीममधून मांडण्यात आली आहे.
मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर नेण्याचा प्रयत्न
आजची पिढी मोबाईलमध्ये अधिक गुंतत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुलांना मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून पुस्तकांकडे वळवण्यासाठी याच ठिकाणी दोन दिवसांच्या बाल पुस्तक प्रदर्शनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या बाल संशोधकांना प्रोत्साहन देऊन भविष्यात चंद्रावर अशा प्रकारची अनोखी शाळा निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात यावे, अशी अपेक्षा या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली आहे.जय हिंद! जय विज्ञान!

टिप्पणी पोस्ट करा