मांगुळ झनक : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण असलेला बैल पोळा मांगुळ झनक येथे मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा केली. यावर्षी पोळ्याचा मान श्री. दत्ता प्रशराम ठाकरे पाटील यांच्याकडे होता.
मांगुळ झनक येथे स्व. फकिरा बानाजी कांबळे यांच्या घराण्यात वर्षानुवर्षे चालत आलेली तोरण बांधण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. यावेळी उत्तम फकिरा कांबळे यांनी पारंपरिक पद्धतीने तोरण बांधले. या तोरणाखाली पारंपरिक पद्धतीने बैलांचे लग्न लावून पोळा सण साजरा करण्यात आला. या अनोख्या परंपरेमुळे उत्सवाला विशेष रंगत आली.
पोळ्यानिमित्त बैलांना आंघोळ घालून रंगीबेरंगी झुली, गोंडे व विविध सजावटीच्या वस्तूंनी सजविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगांना रंग देऊन आकर्षक सजावट केली होती. शेतकरी कुटुंबांनी बैलांची मनोभावे पूजा करून वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या या कष्टकरी पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
उत्सवात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सजविलेले बैल, पारंपरिक वेशभूषा, तोरण आणि बैलांच्या लग्नाचा सोहळा यामुळे गावात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
बळीराजाचा सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळ्याला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण संस्कृती आणि शेतीशी घट्ट नाते असलेला हा सण मांगुळ झनक येथे पारंपरिक वारसा जपत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ‘जय जवान, जय किसान’ असा संदेश देत शेतकरी, कष्टकरी व कास्तकार बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा पोळा उत्सव संस्मरणीय ठरला.

Tags
दिनविशेष