व्यसनाधीनतेच्या विळख्यातून भावी पिढीला वाचवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली रुजवण्यासाठी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय वाशिम व ग्रामीण रुग्णालय मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक .२० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अती.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अविनाश पुरी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद शिंदे.यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बाबनाजी महाराज विद्यालय, कोंडोली (ता. मानोरा) येथे शालेय तंबाखू नियंत्रण व आरोग्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखू आणि गुटखा सेवनामुळे आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम, मुख कर्करोग (Oral Cancer) आणि तंबाखू नियंत्रण कायदा २००३ (COTPA) च्या विविध कलमांवर सविस्तर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. शाळा परिसर पूर्णपणे 'तंबाखूमुक्त शाळा' म्हणून विकसित करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण रुग्णालय मानोरा येथील समुपदेशक हरी काळे यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या असंसर्गजन्य आजारांविषयी मार्गदर्शन केले. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पक्षघात (पॅरालिसिस) यांसारख्या गंभीर व्याधींना प्रतिबंध घालण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी 'घरातील कोणत्याही वडीलधाऱ्या व्यक्तींना अथवा पालकांना तंबाखूजन्य पदार्थ आणून देणार नाही आणि स्वतः सुपारी वा इतर कोणत्याही व्यसनाचे सेवन करणार नाही' असा दृढ संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. पी. राठोड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.