तिरंग्याच्या साक्षीने गोभणीत राष्ट्रभक्तीचा जागर.

श्री. शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

गोभणी (ता. रिसोड) :प्रतिनिधी स्वाती गायकवाड
 श्री. शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे 80 वा स्वातंत्त्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळपासूनच शाळा परिसर तिरंग्याच्या रंगांनी सजलेला होता.
“*जय हिंद जय भारत* च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, केनवड चे सचिव
मा. श्री.*बबनरावजी पाटील गारडे* यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
तिरंगा फडकताच उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीत उभे राहत देशाला मानवंदना दिली.
या क्षणी परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला.यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
राष्ट्रपिता महात्मा गांधी,
स्व.आमदार रामरावजी झनक साहेब
आणि माजी कॅबिनेट मंत्री स्व. सुभाषरावजी झनक साहेब
यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करण्यात आले.
थोर महापुरुषांच्या विचारांना नमन करत विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली.
स्काऊट गाईड विभागाचे प्रमुख श्री पोघे सर आणि त्यांचे विद्यार्थी यांनी आपल्या टीम सोबत देशभक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे प्रतीक असलेल्या
स्काऊट–गाईड पथकाची सलामी दिली...
यांनतर शाळेचे *पर्यवेक्षक श्री हाडे सर* यांनी येणाऱ्या 10 आणि 12 परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्याची शपथ दिली...
शाळेचे मुख्याध्यापक *श्री गावंडे सर* यांनी आपल्या प्रास्ताविकातून
स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले.संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय
ही मूल्ये अंगीकारून जबाबदार नागरिक घडविणे हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्ग 11 वी ची विद्यार्थिनी कु. कल्याणी बोडखे हिने आपल्या क्रांतिकारी भाषणातून देशभक्ती जागृत केली..
कु.*पायल परवीन हासीम शहा *
या विद्यार्थिनीने आपल्या गीतामधून सर्वामध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलीत केली....
 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ,*ऐ मेरे वतन के लोगो*” या भावस्पर्शी गीतातून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली......
या प्रसंगी भारतीय सैन्यात भरती झालेल्या शाळेच्या शेख रेहान , आदित्य गवळकर, करण केदारे निशांत चव्हाण, ज्ञानेश्वर सदार तर महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झालेल्या जीवन गारडे कु पूजा सुनील जाधव सौरभ साबळे शेख मुशरफ या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
शाळेचे माजी विद्यार्थी गोभणी येथील युवक योगेश गारडे यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारून तर शुभम ज्ञानेश्वर साबळे यांनी ड्रॅगन फ्रुट च्या माध्यमातून रोजगाऱ्याच्या नवीन संधी निर्माण केल्या यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आता.
शाळेच्या अंगणातून देशसेवेपर्यंत पोहोचलेले हे जवान आजच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श व प्रेरणास्थान असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रम शिस्त, संस्कार, देशप्रेम आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,
विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी
“संविधानाचे पालन करूया,
देशासाठी जबाबदार नागरिक बनूया”
हा संदेश देण्यात आला.
शेवटी जय हिंद! जय भारत!
या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा कुलकर्णी सर आणि श्री केनवडकर सर यांनी केले तर आभार प्रा.शाम मोरे सर यांनी मानले..
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले...
थोडे नवीन जरा जुने