व्यसनाच्या गुलामीतून मुक्त होण्याचा संदेश; व्यसनमुक्ती केंद्र राजगाव येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात.

 

वाशीम प्रतिनिधी :महादेव आवारे 
राजगाव : व्यसनमुक्ती केंद्र, राजगाव येथे ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर गावंडे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुधीर गावंडे यांनी १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा दाखला देत भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिल्याचे सांगितले. आज मिळालेले स्वातंत्र्य आपण व्यसनाच्या आहारी जाऊन वाया घालवत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले; आता व्यसनाच्या गुलामीतूनही मुक्त होणे गरजेचे आहे. व्यसनाच्या जंजिरा तोडून स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमात उमेश भालेराव यांनी भक्तिगीत सादर केले. तसेच व्यसनमुक्ती केंद्रातील लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, विठ्ठल काळबांडे, महेश गोटे, विठ्ठल सांगळे, मीरा प्रजापती तसेच व्यसनमुक्ती केंद्रातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
थोडे नवीन जरा जुने