:मालेगाव प्रतिनिधी :सुखदेव तायडे
मालेगाव दि. ५ ऑगस्ट २०२६ : जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमाने श्री.मोरेश्वर विद्यालय मुंगळा, ता मालेगाव येथे तंबाखूमुक्त शाळा, मानसिक आरोग्य व विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देणे तसेच असंसर्गजन्य आजारांपासून बचावाबाबत मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखू नियंत्रण कायदा, तंबाखूजन्य पदार्थांचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, मुखाचा कर्करोग, व्यसन लागण्याची प्रक्रिया याविषयी माहिती दिली. तंबाखू मुक्ती साठी टोल फ्री क्रमांक 1800112356 या बाबत माहिती दिली.विद्यार्थ्यांनी गोड सुपारीचेही सेवन टाळावे, तसेच वडीलधाऱ्यांसाठी दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ आणून देऊ नयेत,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, मानसिक आजारांची कारणे, लक्षणे, उपचार, तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक सवयी तसेच जिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य सेवासुविधा तसेच टेली-मानस टोल फ्री क्रमांक १४४१६ विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानसिक आजार लपवू नयेत, अंधश्रद्धेला बळी न पडता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.
ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील समुपदेशक प्रवीण गोरे यांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन खडसे सर, बाविस्कर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.