रिसोड प्रतिनिधी : स्वाती गायकवाड
मांगुळ झनक येथे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी अत्यंत आदरभावाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील आई जगदंबा माता संस्थान येथे भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमेचे पूजन सौ. कमलबाई रामजी कांबळे आणि सौ. लक्ष्मीबाई भगवान गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला.भव्य निबंध स्पर्धापुण्यतिथीचे औचित्य साधून स्थानिक लहु गर्जना ग्रुपमांगुळ झनकच्या वतीने भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पुरोगामी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे भाग घेतला.ग्रामस्थांची मोठी उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन चि.प्रदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला लहु गर्जना ग्रुपचे सर्व सदस्य आणि मांगुळ झनक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक सहकार्याने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
