अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रथम ₹10 हजारांची मागणी; पडताळणीनंतर ₹4 हजारांवर तडजोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई.
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग विभागात कार्यरत असलेल्या खाजगी कक्ष सेवकाला अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ₹4 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
तक्रारदार (वय 56) यांचे 41 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यानंतर त्यांनी नवीन प्रमाणपत्रासाठी 3 जुलै 2026 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर अस्थिरोग विभागातील खाजगी कक्ष सेवक सतीश बबन कवर (वय 33, रा. तामसी, ता. जि. वाशिम) याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुरुवातीला ₹10 हजारांची लाच मागितल्याची तक्रार 15 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची 15 व 17 जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने तडजोडीअंती ₹4 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार 17 जुलै रोजी सापळा रचण्यात आला. आरोपीने तक्रारदाराकडून पंचासमक्ष ₹4 हजारांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून ₹4,245 रोख रक्कम आणि ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू आहे.
या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 7A अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद होताच आरोपीला अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.