वाशीम रेल्वे स्थानकावरून नांदेड–मुंबई एक्सप्रेसला हिरवा झेंडा; मान्यवरांची उपस्थिती.

 


वाशीम | प्रतिनिधी

वाशीम रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या नांदेड–मुंबई एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात भाजपचे वाशीम जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजू पाटील राजे, वाशीम–यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. संजयभाऊ देशमुख, शिवसेनेच्या विदर्भ संपर्कप्रमुख संजना ताई गवळी, भाजपचे वाशीम नगराध्यक्ष मा. श्री. अनिलजी केंदळे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या नव्या रेल्वे सेवेचा मराठवाडा व विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे प्रवास करताना लाभ होणार असून, प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने