वाशीम प्रतिनिधी : पुरुषोत्तम इंगोले
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे तसेच मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक सिकलसेल दिनानिमित्त रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल, वाशीम येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभणकर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. साळुंके, श्री. स्तवण, समन्वयक श्री. इंगोले, समुपदेशक श्री. पवार, तंत्रज्ञ सोनल मिश्रा मॅडम तसेच नर्सिंग महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. विजय काळे यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराची माहिती देत या आजाराबाबत घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि समाजाप्रती विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. सतीश परभणकर यांनी सिकलसेल संदर्भातील विविध रंगीत कार्डधारकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

टिप्पणी पोस्ट करा