वाशीम, प्रतिनिधी :
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती (एससी) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी समस्त मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी वाशीम येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बसस्थानक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आले.
आर्य महाविद्यालयासमोरील परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध वक्त्यांनी मातंग समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच आरक्षणातील उपवर्गीकरणाची आवश्यकता यावर सविस्तर भाष्य केले. शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, राष्ट्रीय लहुजी शक्तीचे परिमल कांबळे, प्रा. ना. च. कांबळे, संजय मानवतकर, लहुजी शक्ती सेनेचे राज्याध्यक्ष नामदेवराव ससाणे (उमरखेड), मोहनराज दुतोंडे, कैलास डाखोरे, संजय वैरागडे, वैशाली इंग्रे, रती गायकवाड, गोपाल बजाड, विजय कांबळे, शांताबाई हनवते, जगदीश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोर्चात हजारोंच्या संख्येने मातंग समाजातील महिला व पुरुष सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा