गवंडी काम करणाऱ्या आई वडिलांचे स्वन झाले साकार.
प्रतिनिधी वाशीम :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोहजा रोड येथील प्रतीक गजानन खडसे याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अवघ्या १९ व्या वर्षी त्याने हे यश मिळवत देशसेवेचे स्वप्न साकार केले.
प्रतीकचे वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई वर्षा, ह्या शेतात मोलमजुरी करतात . एक लहान भाऊ आहे वय १६ वर्ष.
वडिलांचे स्वप्न होते कि प्रतीकणे सरकारी नोकरीत लागावं त्यासाठी आई वडील काबाड कष्ट करत होते, आणि मुलाच्या शिक्षणाला खरंच पुरवत होते, प्रतीकचे प्राथमिक शिक्षण गावात झाले, (१०, वी, १२ वी ) छत्रपती शिवाजी विद्यालय रिठद येथे झाली. ITI प्रथम वर्षाला फिटर या ट्रेड मध्ये शासकीय ITI कॉलेज मध्ये शिकत होता.
सोबत आर्मी ची तयारी करत होता. जिद्द चिकाटी आणि मेहनत असेल तर काही करू शकतो हे प्रतीक आणि त्याचे आई वडील ने सिद्ध करुन दाखवले, प्रतीकने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविले. त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर होताच गावकऱ्यांनी प्रतीकचा सत्कार करून त्याच्या कर्तृत्वाचा गौरव केला. यावेळी आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. आपल्या मुलाने देशसेवेच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल पाहून कुटुंबीय भावूक झाले.
सत्कार समारंभास कॅप्टन बळीराम काढणे, नारायण काढणे, उमेश देशमुख, संजूभाऊ सरनाईक, संदीप सरनाईक, देवेंद्र गवई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतीकच्या कष्टाचे, जिद्दीचे आणि देशभक्तीचे कौतुक केले.
"परिस्थिती नव्हे, तर जिद्द आणि मेहनत माणसाला यशस्वी बनवते," हे प्रतीक खडसे यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.

0 टिप्पण्या