मालेगाव तालुक्यातील अडोळ लघु प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील खडकी-ढंगारे परिसरातील शेतरस्त्यालगत असलेल्या मोठ्या नाल्यावर कॅनॉल व रस्त्याची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर शेतात जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, एका शेतात विहीर खोदकामासाठी आलेल्या खाजगी कंत्राटदाराच्या यंत्रसामग्रीमुळे सदर संरक्षण भिंत कोसळली. पावसाळा तोंडावर आलेला असताना ही भिंत कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात सार्वजनिक पाटबंधारे विभाग, वाशिम येथील कार्यकारी अभियंता यांना माहिती देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही सुरू करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीची दुरुस्ती करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच संबंधित खाजगी कंत्राटदारावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून प्रश्न सोडवावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

0 टिप्पण्या