वाशीम प्रतिनिधी :
कोंढाळा झांबरे
आज दिनांक 17 एप्रिल रोजी कोंढाळा झांबरे येथे महसूल विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला माननीय आमदार श्यामभाऊ खोडे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, गटविकास अधिकारी सोनोने साहेब तसेच MSRLM च्या वैशाली चंद्रकांत सोनोने मॅडम,तसेच काटा सर्कलमधील सरपंच व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येक गावात “एक ग्राम संघ” कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी निवेदन सादर करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलला भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली व नागरिकांशी संवाद साधला.
या प्रसंगी प्रभाग संघ व ग्राम संघाचे पदाधिकारी तसेच कॅडर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वीरेंद्र भाऊ देशमुख (काटा), खांजोडे सर (कोंढाळा झांबरे) यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेना गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरामुळे नागरिकांच्या विविध समस्या एकाच ठिकाणी सोडविण्यास मदत झाली असून, प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला आहे.

Tags
Washim