रुग्णांनी घाबरून न जाता वेळेवर उपचार करावे.-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांचे आव्हान.
प्रतिनिधी :वाशीम
जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, डॉ. पराग राठोड, डॉ. लोणकर, डॉ. गिऱ्हे तसेच रुग्णालयातील वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना डॉ. अनिल कावरखे यांनी हिमोफिलिया या आजाराबाबत सविस्तर माहिती देत रुग्णांनी घाबरून न जाता वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की जिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असून, रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश पुरी यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक श्री. इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. राहुल कसाडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला समुपदेशक राज पवार, सुनील सुर्वे, नर्सिंग कर्मचारी, परिचारिका तसेच मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमातून हिमोफिलियाबाबत समाजातील गैरसमज दूर करून रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प करण्यात आला.

0 टिप्पण्या