Ad Code

पिंपरी अवगण येथे महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न


वाशीम प्रतिनिधी :

समता स्वाईल बहुउद्देशीय फाउंडेशन पिंप्री अवगण ता मंगरूळपीर जिल्हा वाशिम आणि आमची माती आमची माणसं शेतकरी गट पिंपरी अवगण यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती ज्योतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत पिंपरी अवगण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण ग्रामपंचायत टीमचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता स्वाईल बहुउद्देशीय फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रदिप कोकरे यांनी केले. सूत्रसंचालन आमची माती आमची माणसं गटाचे अध्यक्ष सचिन अवगण यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील अवगण यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमची माती आमची माणसं गटाचे सदस्य भारत अवगण यांनी केले.
कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमच्या गावचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी निकम सर यांचे स्वागत करण्यात आले गावचे कृषी सहायक मंगेश कोल्हे उत्कृष्ट कामगिरी गावचे ग्रामसेवक श्री राजे साहेब उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. गावातील तंटामुक्ती अध्यक्ष संजय अवगण उत्कृष्ट कामगिरी करत असल्यास मुळे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये उपस्थित असणारे. सरपंच कल्पना अविनाश अवगण, उपसरपंच रामराव बद्री राठोड, साधना घनश्याम अवगण , किरण राघोजी अवगण , मंजू संदीप अवगण, इंदल सदाशिव राठोड, 
राहुल तुळशीराम तायडे,
श्री बी एन अवगण, गजानन काशीराम अवगण, दीपक राम हरी अवगण, आनंदा महादेव पवार, दिलीप देवराव अवगण पत्रकार, गजानन देविदास. शंकर शिवराम अवगण,
या मान्यवराच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने सत्कार समारंभाचा संस्थेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या