वाशिम | २५ एप्रिल २०२६
जागतिक हिवताप दिनानिमित्त आज जिल्हा रुग्णालय वाशिम येथे भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नीरज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ही रॅली जिल्हा रुग्णालय येथून प्रारंभ होऊन नवीन आयु डी पी, लहुजी नगर, आनंदवाडी, अकोला नाका मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात परतली. रॅलीदरम्यान नागरिकांना हिवताप (मलेरिया) प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली.
रॅलीमध्ये बाकलीवाल विद्यालयाचे श्री. काळे सर यांच्यासह NCC विद्यार्थी, बाहेती हॉस्पिटलचे शिक्षक व नर्सिंग विद्यार्थी, जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी, तसेच आशा व नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरी आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या