विवेक आर महाले
एरंडोल
16 Apr 2026
एरंडोल
16 Apr 2026
जळगांव जिल्ह्यामध्ये बस स्टॅण्ड भागात चोरी करणाऱ्यांवर जिल्हा व पाचोरा शहरात चोरींचे गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवुन कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे पो. नि. राहुलकुमार पवार यांना सुचना दिल्या होत्या.
१५ एप्रिल रोजी फिर्यादी जयश्री स्वप्नील पाटील (वय – २२ वर्ष) रा. विवेकानंद कॉलनी भडगाव रोड, पाचोरा फिर्यादी आसनखेडा येथुन पाचोरा येथे बसने एम. एम. कॉलेज येथे पेपर देण्यासाठी आली असता पेपर संपवुन दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पाचोरा बस स्टॅण्ड येथुन आसनखेडा येथे जाण्यासाठी जळगांव बस मध्ये बसुन जात असतांना फिर्यादीचे गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेलेबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. यावरुन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना गोपनिय माहीतीच्या आधारे महीला संगिता करण सोळुंखी (वय – ४२ वर्ष) ही पाचोरा बस स्टॅण्ड परीसरात चोरी करुन फिरत आहे अशी माहीती प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाने सदर महीलेस ताब्यात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता तिने गुन्ह्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल एक सोन्याचा मनी व दोन डोरले असा मुद्देमाल काढुन दिला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभआगीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.उ. नि. कृष्णा घायाळ स. फौ. विलास पाटील, पो. हे. काॅ. श्रीकांत गायकवाड, अंमलदार पो. कॉ. योगेश पाटील, पो. कॉ. गणेश कुवंर, महीला पोलीस अंमलदार प्रिया आहेर यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. काॅ. श्रीकांत गायकवाड हे करत आहेत
Tags
जळगाव
