Ad Code

गरिबांचे फ्रीज” बाजारात! उन्हाळ्यात मातीच्या मडक्यांना वाढती मागणी.

 

वाशीम, प्रतिनिधी:

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना वाशीममध्ये पारंपरिक मातीची मडकी म्हणजेच “गरिबांचे फ्रीज” पुन्हा एकदा बाजारात दाखल झाले आहेत. थंडगार पाणी देणाऱ्या या मडक्यांना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.फ्रिज परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी मडके हा उत्तम पर्याय ठरत असून, नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड ठेवण्याची क्षमता असल्यामुळे याला “गरिबांचे फ्रीज” असे संबोधले जाते.स्थानिक कुंभारांनी विविध आकारातील मडकी, सुरई, आणि माठ विक्रीसाठी ठेवले असून, किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.विशेष म्हणजे, मडक्यातील पाणी केवळ थंडच राहत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. त्यामुळे अनेक नागरिक फ्रिजऐवजी या पारंपरिक पर्यायाकडे वळताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या