Ad Code

आसेगाव (पेन) येथे इंडियन कोब्रा सापाला जीवदान; सर्पमित्र दशरथ मजुळकर यांची धाडसी कामगिरी

 

रिसोड :आसेगाव (पेन), (प्रतिनिधी)

दि. 19 मार्च 2026 

जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्पमित्र दशरथ मजुळकर यांनी पुन्हा एकदा धाडसी कामगिरी करत विषारी सापाला सुरक्षितपणे पकडून जीवदान दिले.

आसेगाव (पेन) येथील सिलिंदर परिहार यांच्या राहत्या घरी साप दिसल्याने त्यांनी तात्काळ सर्पमित्राशी संपर्क साधला. माहिती मिळताच दशरथ मजुळकर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. रात्री सुमारे 9:10 वाजता त्यांनी अत्यंत दक्षतेने इंडियन कोब्रा (नाग) साप पकडून सुरक्षितरित्या रेस्क्यू केला.


या वेळी आसेगाव (पेन) येथील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्पमित्राने कोणतीही इजा न करता सापाला सुरक्षितपणे पकडत नागरिकांच्या जीवितालाही धोका टाळला.

यावेळी दशरथ मजुळकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, अशा धोकादायक परिस्थितीत सापाला मारू नये, तर त्वरित सर्पमित्राशी संपर्क साधावा. त्यांनी आपला संपर्क क्रमांक 7499056791 उपलब्ध करून दिला आहे.

दरम्यान, साप हे पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून ते उंदीर व कीटकांवर नियंत्रण ठेवून शेतीचे संरक्षण करतात. अन्नसाखळी संतुलित ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच काही सापांच्या विषाचा उपयोग औषधनिर्मितीसाठीही केला जातो.

मात्र, जंगलतोड, वाढते शहरीकरण, प्रदूषण, अंधश्रद्धा आणि भीतीमुळे लोकांकडून साप मारले जाणे यामुळे सापांच्या जाती हळूहळू नष्ट होत आहेत. त्यामुळे सापांचे संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

“साप वाचवा – पर्यावरण वाचवा” हा संदेश या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या