वाशीम (प्रतिनिधी) :
साखरा येथील भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी वरिष्ठ प्राथमिक शाळेने या वर्षीही उज्ज्वल यश संपादन करत तब्बल 21 विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवले आहे.
शाळेतील शिक्षकांची उत्कृष्ट अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम व जिव्हाळा, तसेच पालकांप्रमाणे केलेले मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची कठोर मेहनत यामुळे शाळेने नेहमीप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या यशामध्ये झनक सर यांच्या मार्गदर्शनाचा विशेष वाटा असून, त्यांनी शाळेसह वाशीम जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या शिकवणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे :
मंजुश्री काळे, रिद्धी चव्हाण, हर्षदा कोरडे, पयोशनी ठाकरे, वैभवी ढोबळे, अनुष्का झनक, कृतिका कांबळे, जय राऊत, यश ढोबळे, साईनाथ ढोबळे, कृष्णा ठाकरे, अमित कांबळे, सीमंत चौधरी, देवांश ठाकरे, हर्ष घोडके, स्वरूप व्यास, जगदीश खंदारे, इंद्रजीत पंडित, प्रियांशू भगत, वेदांत बुरे, आदित्य जाधव.“आपल्या शाळेचा हा यशाचा प्रवास असाच पुढेही सुरू राहो,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या