Ad Code

आर्टीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुनील वारे यांनी पदभार स्वीकारला!


मुंबई, दि. १२ मार्च : 

 मा.श्री सुनिल वारे यांनी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच भारतीय सनदी सेवेतिल वरिष्ठ अधिकारी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळत असल्याने ही घटना आर्टीच्या इतिहासातील महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

पदभार स्वीकारण्यापूर्वी मा.सुनील वारे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पदभार स्वीकारला. यावेळी आर्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी त्यांचे स्वागत केले.

  पदभार स्वीकारताच मा.सुनील वारे यांनी संस्थेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत, आर्टीचे स्पष्ट व्हिजन आणि मिशन निश्चित करण्याचा निर्णय घेतला.आर्टीच्या माध्यमातून मातंग व तत्सम समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस विकास आराखडा (रोडमॅप) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मा.सुनील वारे हे भारतीय रेल्वे सेवेत (IRAS) २००० सालच्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी भारतीय रेल्वेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेचे महासंचालक म्हणूनही त्यांनी या अधी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात बार्टीच्या विविध योजना व उपक्रमांना नवी दिशा प्राप्त करुन दिली .

यावेळी बोलताना वारे म्हणाले की, “आर्टीच्या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे व महामानवांच्या परिवर्तनवादी विचारांनी प्रेरित होऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संस्थेची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

 या प्रसंगी निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, प्रकल्प व्यवस्थापक अनिल वारे, प्रकल्प व्यवस्थापक धोंडीबा नामवाड, उपलेखापाल सुरेश साळवी, जनसंपर्क अधिकारी स्वप्नील भालेराव, संशोधन अधिकारी ,विनायक लांगी,डॉ. आम्रपाली थोरात, डॉ.धनाजी भिसे, विदुला मोहिते, सायली लोमटे, योगिता कांबळे, भक्ती बर्गे, आकाश चव्हाण, अश्विनी बाबर, अक्षय जाधव यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, दिवसभरात विविध सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधवांनी आर्टीच्या कार्यालयात भेट देऊन मा.सुनिल वारे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या