Ad Code

रक्तदानाचा संदेश देणारा "नातं रक्ताचं" लघुचित्रपटाला बेस्ट फिल्म अवॉर्ड!


वाशिम (प्रतिनिधी) -   

     बुलढाणा फिल्म सोसायटी आणि वाडेकर फिल्म्स द्वारे आयोजित राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये रक्तदानावर आधारित असलेल्या संतोष बायस्कार तऱ्हाळकर यांच्या राजनंदिनी फिल्म्स प्रस्तुत "नातं रक्ताचं" ह्या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट 'बेस्ट फिल्म अवॉर्ड' प्राप्त झाला आहे.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेअभिनेते आणि नाट्य कलावंत सुभाष बावस्कर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेते मोहन काळे, संपादक रफिक कुरेशी, नाट्य दिग्दर्शक व कलावंत गणेश बंगाळे, नाट्य दिग्दर्शक व कलावंत गणेश तांगडे तसेच वाडेकर फिल्म्सचे संस्थापक तथा लेखक - दिग्दर्शक भास्कर वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

     "नातं रक्ताचं" ह्या लघुचित्रपटाची कथा, पटकथा तसेच निर्माता - दिग्दर्शक संतोष बायस्कार तऱ्हाळकर असून संवाद डॉ. रावसाहेब काळे यांचे आहेत. कार्यकारी निर्माती सौ. नंदिनी संतोष बायस्कार आहेत. या लघुचित्रपटात विदर्भातील कलावंत राम आपोतीकर, किरण गोल्डे, सुहास वैद्य, सुनीता धुरंधर, हर्षद बोदडे, हर्षा राऊत, राहुल गिते, गौरव दळवी, विद्या खाडे, भाऊराव मोकळे, विद्या वानखडे, संतोषकुमार ताले, सुनील केंगारकर यांच्या भूमिका असून विशेष प्रमुख भूमिका संतोष बायस्कार तऱ्हाळकर यांची आहे.

     यापूर्वी पुणे येथील आरोग्य चित्रपट महोत्सवात देश - विदेशातून आलेल्या लघुचित्रपटांमधून "नातं रक्ताचं" या लघुचित्रपटाची निवड झाली होती, हे विशेष! अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाची 'ऑडिशन' करीता परवानगी घेतल्यावर एका नवीन शैक्षणिक लघुचित्रपटाची लवकरच निर्मिती करणार असल्याचे निर्माता - दिग्दर्शक संतोष बायस्कार तऱ्हाळकर यांनी सांगितले आहे. 

                  ______________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या