Ad Code

ऍड.मारोती अभिमान कालापाड यांचा विजेचा झटका लागून मृत्यू.

 


खिरडा तालुका मालेगाव :

वाशिम जिल्ह्यातील खिरडा गावातील तालुका मालेगाव येथील मारोती अभिमान कालापाड यांचा विजेचा झटका  लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेतीमध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता ही घटना घडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले

मालेगाव तालुका न्यायालयात  मध्ये विधी स्वयंसेवक म्हणून त्यांनी काही दिवस काम केले तसेच एल.एल.बी. पूर्ण केली व वकिली व्यवसायाकडे वळले वकिली करत आपल्या शेतीमधेही ते काम करायचे. त्यांना दोन अपत्य असून पत्नी आई वडील असे छोटे कुटुंब आहे .मेहनती व जिद्दही स्वभावाचे असल्याने त्यांना फावल्या वेळेत घरी वसवल्या जात नव्हते त्यामुळे ते नेहमीप्रमाणे शेताल पिकला पाणी देण्यास गेले व मोटर चालू करण्वयास गेले असता हि दुर्घटना घडली .अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे सव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

.
📄 आमचे Edition E-Paper PDF डाउनलोड करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या