Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

पवन माहेश्वरी यांनी रचला इतिहास.; सचिवपदाच्या निवडणुकीत विक्रमी विजय.



अकोला / प्रतिनिधी :

जनरल एज्युकेशन सोसायटी (BGE) च्या सचिवपदासाठी रविवारी (४ फेब्रुवारी) झालेल्या निवडणुकीत विद्यमान सचिव पवन माहेश्वरी यांनी एकहाती विक्रमी विजय मिळवत इतिहास रचला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल तापडिया यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

या निवडणुकीत पवन माहेश्वरी यांना एकूण १४ पैकी ९ मते मिळाली, तर अनिल तापडिया यांना ५ मते मिळाली. आजवर झालेल्या निवडणुकांमधील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

सोसायटीच्या एकूण सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. काही सदस्य बाहेरगावी व रुग्णालयीन कारणांमुळे अनुपस्थित असल्याने मतदानाची टक्केवारी काहीशी घटली होती. तरीही माहेश्वरी यांच्यावर सदस्यांनी दुसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला. सचिवपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. अखेरीस पवन माहेश्वरी यांनी विजय खेचून आणला.

पवन माहेश्वरी हे आर.एल.टी. सायन्स कॉलेज समूहाशी संबंधित असून सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता आणि सदस्यांशी असलेले सुसंवाद यामुळे त्यांना हा विजय मिळाल्याचे बोलले जात आहे.

या विजयाबद्दल विविध सामाजिक संघटना व मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments