Ticker

6/recent/ticker-posts 🔥 Breaking News | 🔔 Subscribe Awaj TV10 Marathi

Ad Code

सौं.अर्चना गिते यांचे संशोधन क्षेत्रात घवघवीत यश; यूकेमध्ये डिझाइन नोंदणी.



UK IPO कडून ‘Registered Design’ मान्यता; मत्स्यपालन क्षेत्राला होणार फायदा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

परळी वैजनाथ येथील संशोधक सौ. अर्चना मधुकर गिते यांनी बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या संकल्पनेच्या डिझाइनला युनायटेड किंगडम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK IPO) कडून अधिकृत “Registered Design” मान्यता प्राप्त झाली आहे.

त्यांच्या या डिझाइनची आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणांतर्गत नोंदणी करण्यात आली असून नुकतेच त्यांना अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशामुळे शैक्षणिक संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख अभ्यास यांतील दुवा अधिक मजबूत झाला आहे.

सौ. गिते यांच्या संशोधनामुळे मत्स्यपालन क्षेत्रातील स्वयंचलित खाद्य व्यवस्थापन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यास मदत होणार आहे. त्यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या तांत्रिक उपाययोजनांमुळे स्थानिक संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

शैक्षणिक संशोधन केवळ प्रबंधापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष उद्योग आणि समाजोपयोगी क्षेत्रात कसे उपयोगी पडू शकते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.

या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments