उमेद अभियानांतर्गत फिरते विक्री केंद्राचा शुभारंभ.

 

वाशिम | प्रतिनिधी :

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत फिरते विक्री केंद्र सुरू करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.) तसेच वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अर्पित चौहान (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी,पांडुरंग ठोंबरे,उमेद अभियानाचे प्रकल्प संचालक किरण कोव्हे,तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी, कर्मचारी व संबंधित मान्यवर उपस्थित होते. श्रीनिवास व्हेइकल्स इंडिया LLP, वाशिम यांनी या उपक्रमासाठी वाहनाचा पुरवठा केला आहे यावेळी श्रनिवास व्हेईकलचे मॅनेजर रिजवान हक व इतर टीम उपस्थित होती.

या नव्या उपक्रमामुळे उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री वाढण्यास मोठी मदत होणार आहे. फिरत्या विक्री केंद्रामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना थेट दर्जेदार उत्पादने उपलब्ध होणार असून महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

थोडे नवीन जरा जुने