प्रतिनिधी:-
वि रा महाले
एरंडोल
17/01/2026
-एरंडोल येथील सम्यक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ग्रंथालय व विज्ञान प्रयोगशाळेचा नामकरण सोहळा संपन्न झाला.
एरंडोल येथील नामांकित सम्यक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच एक विविध संभागृहांना नामकरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या ग्रंथालयाला 'कै. प्रा. शेखर सोनाळकर' यांचे नाव, तर विज्ञान प्रयोगशाळेला 'कै. निश्चय तारानाथ पाटील' यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वासंती ताई दिघे (सोनाळकर) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कबीर सोनाळकर आणि नीती निश्चय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ नुपूर पाटील, मुख्याध्यापिका नीता पाटील आणि प्राजक्ता महाजन उपस्थित होत्या.
मान्यवरांचा परिचय आणि कार्याचा गौरव:
कै. प्रा. शेखर सोनाळकर: ते जळगावच्या एम. जे. कॉलेजचे माजी उपप्राचार्य, प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आणि ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत होते. त्यांच्या नावाने ग्रंथालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्वत्तेचा आणि वाचन संस्कृतीचा वारसा लाभणार आहे. कै. निश्चय तारानाथ पाटील: ते पाटबंधारे विभागात नागपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी आणि न्याय व समतेसाठी आयुष्यभर कार्य केले. विज्ञान प्रयोगशाळेला त्यांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Facebook
0 Comments