आजअन्नोदय रुग्णालयात सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियानाचा शुभारंभ
(15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान विशेष मोहीम)
वाशिम | प्रतिनिधी
आज दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी अन्नोदय रुग्णालयात अॅनिमिया विशेष अभियान (15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026) चा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ
मा. जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निल कावरखे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनाश पुरी निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पराग राठोड,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काके, जिल्हा विस्तार व माहिती अधिकारी श्री. रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानाअंतर्गत महिलांमध्ये, किशोरवयीन मुलींमध्ये व बालकांमध्ये
अॅनिमियाची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात येणार आहे.
Health, Washim News, Government Health Scheme

Facebook
0 Comments