Top News

एरंडोल तालुक्यातील तळई उत्राण मार्गावर भीषण अपघात,36 वर्षीय तरुणाचा मृत्यू.

प्रतिनिधी :- विवेक आर महाले 
एरंडोल 

 एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील तळई उत्राण रस्त्यावर भीषण अपघात झाला असून त्यात 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

 सविस्तर माहिती अशी आहे की तळई येथील सावता मंदिरासमोरील रस्त्यालगत अपघात झाला असून तळई येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाचा काल रात्री जागीच मृत्यू झाला. या 
प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे 

फिर्यादी योगेश पाटील(39 तळई )यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला 

 योगेश पाटील यांचा लहान भाऊ विलास पाटील वय 36 हा 23 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेनऊच्या दरम्यान आपल्याला लाल रंगाची प्लेटिना घेऊन घरी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव इलेक्ट्रिक स्कूटी ने धडक दिली. धडक इतकी ते लगेच जोरात होती की ते लगेच जमिनीवर खाली पडले व त्यांच्या नाकातून कानातून रक्तस्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. गावातील लोकांच्या मदतीने त्यांना भडगाव येथील खाजगी रुग्णालया त अंजनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना साडेदहाच्या सुमारास मयत घोषित केले.
 अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून इलेक्ट्रिक स्कुटी वरील तामस्वरे हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत 

 मयत विलास पाटील यांच्या पश्चात आई-वडील एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने