मातंग समाजातून डॉक्टर होण्याचा मान; गावाच्या शैक्षणिक वाटचालीत मानाचा तुरा.
रिसोड प्रतिनिधी :
मांगुळ झनक येथील अक्षय नंदा भारत कांबळे यांनी BHMS (Bachelor of Homoeopathic Medicine and Surgery) ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या यशामुळे मांगुळ झनक गावाच्या शैक्षणिक वाटचालीत मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अक्षय कांबळे यांनी पुणे येथील चिंचवडमधील लोकमान्य मेडिकल कॉलेज येथे BHMSचे शिक्षण घेतले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक अंतर्गत असलेला हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेपाच वर्षांचा कालावधी लागतो. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि ध्येय निश्चित ठेवून त्यांनी हे यश संपादन केले.
अक्षय यांच्या या यशामागे आई-वडील, कुटुंबीय आणि नातेवाईकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या शिक्षणासाठी कुटुंबीयांनी दिलेले प्रोत्साहन, पाठबळ आणि त्याग यामुळेच त्यांनी वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
अक्षय कांबळे यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, मांगुळ झनकच्या शैक्षणिक वाटचालीतील प्रेरणादायी टप्पा मानला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण करावे, यासाठी त्यांचा शैक्षणिक प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
दरम्यान, लहु गर्जना ग्रुप, मांगुळ झनक आणि समस्त मित्रपरिवाराच्या वतीने डॉ. अक्षय नंदा भारत कांबळे तसेच त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा