ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दाताळाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश.

         

प्रतिनिधी स्वाती गायकवाड 
दाताळा : दाताळा शिक्षण बहुउद्देशीय संस्था, दाताळा संचलित डी. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दाताळा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल तीन सुवर्णपदके व एक रौप्यपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये चेतन राजू गाडेकर याने सुवर्णपदक, हर्षल अनंता राऊत याने सुवर्णपदक, ऐश्वर्य ज्ञानदेव राणे याने रौप्यपदक, तर सर्वेश विजय इंगळे याने सुवर्णपदक मिळविले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे डी. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दाताळा यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या यशाबद्दल संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
थोडे नवीन जरा जुने