वाशिम : प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील सावरगाव जिरे येथे 20 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान दिगंबर भोणे यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीत घरातील मौल्यवान वस्तूंसह सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.
आगीची तीव्रता मोठी असल्याने घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत महत्त्वाची कागदपत्रे व इतर मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेमुळे दिगंबर भोणे यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नुकतेच पावसा अभावी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे, त्यात हे नवीन संकट, ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे आग
वीजवण्यासाठी शहरातून अग्निशमक दल यंत्रणा येण्यास खूप उशीर लागते, ग्रामीण भागातील रस्त्यातील रस्त्याची अवस्था व चेहरा पासून गावाचे अंतर यामुळे ते लवकर पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे अधिक नुकसान होते.
प्रशासनाने लवकरात लवकर या घटनेचा पंचनामा करावा व घरमालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती व मागणी घर मालकाकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा