रिसोड तालुका प्रतिनिधी : स्वाती गायकवाड.
रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्रगतिशील शेतकरी तसेच सुशिक्षित युवकांनी आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या नेतृत्वावर व विकासाच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी नव्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या युवकांनी काँग्रेसच्या विचारधारेसोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार अमित सुभाषराव झनक यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या युवकांचे स्वागत करून त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
या पक्षप्रवेशामुळे लिंगा कोतवाल परिसरातील काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला गावातील युवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा