Top News

पोळ्याच्या दिवशी करंट लागून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे 60 हजारांचे नुकसान.

मालेगाव तालुक्यातील कुतरडोह येथील घटना.


मालेगाव : मालेगाव तालुक्यातील कुतरडोह येथे पोळ्याच्या दिवशी सकाळी सुमारे 7 वाजता विद्युत प्रवाहाचा धक्का लागून सुखदेव तायडे यांच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बैलाची किंमत अंदाजे 60 हजार रुपये असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अभियंता लाडे साहेब तसेच पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर प्राची सोनुने यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुभाष भुराकडे, अमोल जामकर आणि संतोष मुंढे यांच्यासह संबंधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पोळ्याच्या सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी सुखदेव तायडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुतरडोह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने