तंबाखूच्या दुष्परिणामांवर कामरगावच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; 'तंबाखूमुक्त जीवन' जगण्याचा संकल्प!


वाशीम प्रतिनिधी :
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम आणि ग्रामीण रुग्णालय कामरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23 जुलै 20026 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे , वैद्यकीय अधीक्षक .डॉ. भाऊसाहेब लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एम.श्री.जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कामरगाव ता.कारंजा येथे तंबाखू नियंत्रण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.राठोड सर उपस्थित होते. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू ,गुटखा, खर्रा, बिडी सिगारेट या सारख्या तंबाखू जन्य पदार्थांमुळे मानवी शरीरावर होणारे शारीरिक दुष्परिणाम,मुख कर्करोग प्राथमिक लक्षणे , तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा 2003) तंबाखू मुक्ती साठी असलेला टोल फ्री क्रमांक 1800-11-2356 बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले गुटखा, पानमसाला, सिगारेट, बीडी तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. तंबाखू कंपन्यांच्या आकर्षक जाहिराती, सोशल मीडियावरील जाहिराती ,प्रचार आणि मित्रांच्या दबावाला बळी न पडता निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला. 
ग्रामीण रुग्णालय कामरगाव येथील समुपदेशक गणेश रवने यांनी विद्यार्थ्यांना रक्तदाब, हृदयरोग ,मधुमेह, पक्षघात या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून सकारात्मक निरोगी जीवनशैली जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या शेवटी तंबाखू मुक्ती ची शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प केला. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने