Ad Code

प्रामाणिकतेचा गौरव! पोलीस कर्मचारी अश्फाक बेनिवाले यांचा SP अनुज तारे यांच्याकडून सत्कार

वाशीम जिल्ह्यात प्रामाणिकतेचा आदर्श घालून देणाऱ्या पोलीस कर्मचारी अश्फाक बेनिवाले यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वाशीम प्रतिनिधी :महादेव आवारे 

 दिवसांपूर्वी, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या गर्दीत एका वृद्ध दांपत्याची लाखो रुपयांची सोन्याची बॅग हरवली होती.
कर्तव्यावर असताना ही बॅग पोलीस कर्मचारी अश्फाक बेनिवाले यांना सापडली. त्यांनी कोणताही मोह न ठेवता त्या बॅगेबाबत सखोल चौकशी करून ती संबंधित वृद्ध दांपत्याला प्रामाणिकपणे परत केली.
या उल्लेखनीय प्रामाणिकतेमुळे वाशीम जिल्ह्यात सर्वत्र अश्फाक बेनिवाले यांचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान केला.
या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो—प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांची पावती समाजाकडून नेहमीच मिळत असते. समाजामध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि इतरांनाही चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.
अनेक वेळा प्रामाणिकपणाची योग्य दखल घेतली जात नाही, त्यामुळे नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. मात्र, वाशीम जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून एक सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे.
अशा प्रकारचा सन्मान हा संबंधित कर्मचाऱ्यासाठी अभिमानाची बाब असून भविष्यातही अधिक उत्साहाने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी अश्फाक बेनिवाले यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या