Ad Code

वाशीममध्ये प्रामाणिकतेचा आदर्श! पोलीस कर्मचाऱ्याने परत केली सोन्याची पिशवी.

माणुसकी अजून जिवंत आहे! पोलीस कर्मचाऱ्याचा आदर्श!

वाशीम प्रतिनिधी :एम, एस. आवारे.

वाशीम जिल्ह्यात एक आश्चर्यकारक आणि माणुसकीचा संदेश देणारी घटना समोर आली आहे. आजच्या काळात माणुसकी हरवत चालली आहे, असे चित्र सर्वत्र दिसत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.
वाशीम येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई अश्फाक बेनिवाले यांनी रस्त्यावर सापडलेली सोन्याची पिशवी संबंधित वृद्ध दांपत्याला प्रामाणिकपणे परत केली.
आजच्या समाजात पोलीस विभागाबाबत अनेकदा नकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला जातो. सामान्य नागरिकांना त्रास देणारे, दमदाटी करणारे अशी टीका देखील होताना दिसते. मात्र, या घटनेमुळे पोलीस विभागाची सकारात्मक बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे.
अश्फाक बेनिवाले हे मुळात समाजकार्याची आवड असलेले असून त्यांनी समाजकार्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश घेतला आणि सध्या ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना एका वृद्ध आजी-आजोबांची सोन्याची पिशवी हरवली होती. ही पिशवी कर्तव्यावर असताना अश्फाक बेनिवाले यांना सापडली. त्यांनी कोणताही मोह न ठेवता योग्य चौकशी करून ती पिशवी संबंधितांना परत केली.
आजच्या काळात रस्त्यावर पडलेली छोटी वस्तू देखील परत मिळणे कठीण असताना लाखो रुपयांचे सोनं प्रामाणिकपणे परत करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. यासाठी चांगले संस्कार, मूल्ये आणि प्रामाणिकता आवश्यक असते — आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अशफाक बेनिवाले.
ही घटना केवळ पोलीस विभागासाठीच नव्हे तर संपूर्ण वाशीम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून अशफाक बेनिवाले यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या