Ad Code

वाशिम शहरात कोटपा कायद्यांतर्गत कारवाई; ३६०० रुपयांचा दंड वसूल.

                               
  वाशिम : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिमच्या वतीने तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाने शहरातील विविध ठिकाणी धडक कारवाई केली. ही मोहीम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान वाशिम शहरातील बस स्थानक, पोस्ट ऑफिस परिसर, पुसद नाका, हिंगोली नाका तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील पानटपरी धारकांकडून कोटपा (2003) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित पान टपरी धारकावर दंडात्मक कारवाई करून एकूण ३६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढरकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा समन्वयक मंगेश गायकवाड तसेच शहरी पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिंदे आणि विशाल इंगळे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सदर कारवाईमुळे तंबाखूविरोधी जनजागृतीला चालना मिळून नियमांचे पालन करण्यास पान टपरी धारक यांना इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या