श्री शिवाजी हायस्कूल व इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गोभणी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्री जाधव सर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुनील साबळे सर, श्री घायाळ सर, लेमाडे सर, घोटे सर, खराटे सर, पांढरे सर, अंभोरे मॅडम, गवळी सर, समिना मॅडम तसेच विनोद मोरे सर व दुर्गेश आढाव सर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचे जीवनकार्य, त्यांचे शोध व विज्ञान क्षेत्रातील योगदान यावर आधारित विविध प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे देत आपल्या ज्ञानाची चमक दाखवली.
कार्यक्रमाचे परीक्षण समिना मॅडम आणि प्रा. सुनील साबळे सर यांनी केले.
या स्पर्धेत कु. गौरी विनोद दांदडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिला भारतीय संविधान भेट देऊन अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. शाम मोरे सर व प्रा. कुलकर्णी सर यांनी केले. स्पर्धेचे आयोजन श्री केनवडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री सुनील मोरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विज्ञान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जिज्ञासा वाढीस लागली, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

0 टिप्पण्या