इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे, एस बी चव्हाण ,प्रमुख मार्गदर्शक आर ए सरनाईक , मॉड पी व्ही पवळ, ए.ए.गवळी,एस पी नंदकुले आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.स्वागत
समारंभानंतर वर्ग सातवा अ मधील ऋतुराज देशमुख या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली.वर्ग सहावा अ मधील विद्यार्थ्यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शाळेला भेट दिली.वर्ग नववा अ मधील महेश बोराडे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन परिचयावर आपले मत व्यक्त केले.वर्ग आठवा ब मधून कृष्णा मोरे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा रणसंग्राम विद्यार्थ्यांसमोर उभा केला व प्रेक्षकांची मने जिंकली. वर्ग सातवा अ मधून मरोडकर या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांचे बालपण तसेच त्यांचे स्वराज्याचे योगदान आणि रयतेविषयीची काळजी या विषयावर आपले मत व्यक्त केले.वर्ग सातवा ब मधून संकेत मुरकुटे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. व आपल्या सुमधुरवाणीतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आर एस सरनाईक विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की शिवचरित्र हा विषय फक्त वाचनाचा नसून तो आचरण करण्याचा आहे
प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे आचरण करावे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.आणि विविध प्रसंगातून व उदाहरणांमधून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दल जागृत केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सी.एम. ठाकरे सरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की शिवाजी महाराज म्हणजे गुणांची खाण आहे आणि आपण त्यांचा एखादा तरी गुण अंगीकारला तर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण शिवाजी महाराजांच्या तत्वांचं ,गुणांचं आचरण करायला पाहिजे .कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वर्ग नववा अ चे वर्गशिक्षक के व्ही बोबडे तथा सर्व विद्यार्थी यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोगरकर यांनी केले तर आभार ईशांत क्षीरसागर या विद्यार्थ्याने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बी.डी.सोनटक्के,रामचंद्र ठाकरे आणि अब्दुल गौरवे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षकांची उपस्थिती होती .

Facebook
0 Comments